अभिनेता अजय देवगणचा दुसरा मराठी सिनेमा ‘आपला मानूस’चा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सिनेमाच्या या पोस्टरमध्ये नाना बाईक चालवताना दिसत आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव लक्ष वेधून घेणारे आहेत. तसेच ‘हा सैतान बाटलीत मावणार नाय’ अशी टॅगलाईनही देण्यात आली आहे. अजय देवगणची निर्मिती असणारा हा आगळावेगळा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे .या आधी अजयने विटीदांडू या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. काजोलमुळे अजय देवगणचा मराठीकडे ओढा आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews